औरंगाबाद- गेल्यावर्षी राज्यभरातील शेतकर्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला. संपानंतर सरकारने हस्तक्षेप करीत शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करून काही मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. परंतु वर्ष उलटून ही सरकारने त्यांच्या मागण्या सोडविल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एका शेतकरी किसान क्रांती संघटनेच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
राज्यभरातील
शेतकर्यांनी गतवर्षी जून महिन्यात शेतकर्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केले.
शेतकर्यांनी दुधाचा व भाजीपाल्याचा पुरवठा थांबविला होता. अनेक ठिकाणी शेतकर्यांनी
रास्ता रोको आंदोलन केले. तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेऊन शेतकरी संघटनेच्या नेत्यासोबत चर्चा
केली होती.
शेतकर्यांच्या
मालाला हमीभाव दुधाला योग्य दर देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण वर्ष
उलटून गेले तरी राज्य सरकारने शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष दिले नाही.
त्यामुळे मंगळवारी किसान क्रांती शेतकरी संघटनेच्या कृती समितीची बैठक पुणतांबा
येथे घेण्यात आली. या बैठकीत राज्य सरकारने शेतकर्यांच्या प्रश्नी उदासीन धोरण
स्वीकारल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच येणार्या २६ जानेवारी
प्रजासत्ताक दिनापासून पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
लोकसभेच्या
निवडणुका काही महिन्यावर आपल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीत
शेतकरी वर्ग सत्ताधारी पक्षापासून दूर गेला. त्यामुळे भाजपचा सफाया झाला. असे असतानाही राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस शेतकर्यांच्या प्रश्नावर घोषणाबाजी शिवाय काही करताना दिसत
नाही. त्यामुळे शेतकर्यांचे आंदोलन पुन्हा सुरू होणार असल्याचे दिसते. शेतकर्यांचे
आंदोलन वाढत गेले तर त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होऊन सत्ताधाराला बसण्याची
चिन्हे दिसत आहे.